दुर्दैव असे की घटनास्थळी मृत्यू झालेल्या तिन्ही मृतकांना वडील नाहीत.
दर्यापूर : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन कुटुंब प्रमुखांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आल्याने शहर दुखः आणि वेदनांनी हळहळले. दर्यापूर शहरवासीयांसाठी काळा दिवस ठरला.दर्यापूर-अकोला महामार्गावर दोन वाहनांच्या समोरासमोर धडकेत एकाच गावातील तीन मित्रांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुर्दैव असे की तिन्ही मृतकांना वडील नाहीत, घरचे हेच कर्ते म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत असताना काल त्यांचा जीवनाचा शेवटचा दिवस ठरला.मृतकातील प्रतीक बोचे यांच्या पाठीमागे आई, पत्नी व एक वर्षाची चिमुकली आहे. थोड्या दिवसांअगोदरच तिचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते, असा सुखद क्षण बोचे कुटुंबीयांनी अनुभवला. परंतु काळाने ते सुख हिरावून घेतले. त्यामुळे आई, पत्नी, मुलगी यांचे छत्र हिरावले. सोबतचा सहकारी मित्र आनंद ऊर्फ गोलू बाहकार हासुद्धा कुटुंबप्रमुख होता. तो मूळ अकोला जिल्ह्यातील कानशिवनी या गावातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून दर्यापूर येथील त्यांच्या मामाकडे राहत होता. त्यालासुद्धा वडील नसून आई आणि एक लहान बहीण त्याच्या पश्चात आहे. त्यांचेसुद्धा छत्र हरपले. त्याच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. तिसरा सहकारी विनीत बिजवे यांच्या पाठीमागे आई व तीन बहिणी, असा आप्त परिवार आहे. विनीतसुद्धा कंत्राटी पद्धतीने आपला उदरनिर्वाह भागवीत होता. तर कुटुंबप्रमुख म्हणून त्याच्यावरती धुरा होती. एकंदरीत बघता तिन्ही युवकांना वडिलांचे छत्र नव्हते. तीनही मृतकांचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात झाले.
तीनही युवकांची एकाच दिवशी अंत्ययात्रा निघाली. दर्यापूर येथील आशा-मनीषा मोक्षधाम येथे अग्नी देण्यात आला. दर्यापूर शहरवासीयांसाठी काळा दिवस ठरला. दर्यापूर-अकोला महामार्गावर दोन वाहनांच्या समोरासमोर धडकेत एकाच गावातील तीन मित्रांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुर्दैव असे की तिन्ही मृतकांना वडील नाहीत, घरचे हेच कर्ते म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत असताना काल त्यांचा जीवनाचा शेवटचा दिवस ठरला. मृतकातील प्रतीक बोचे यांच्या पाठीमागे आई, पत्नी व एक वर्षाची चिमुकली आहे. थोड्या दिवसांअगोदरच तिचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते, असा सुखद क्षण बोचे कुटुंबीयांनी अनुभवला. परंतु काळाने ते सुख हिरावून घेतले. त्यामुळे आई, पत्नी, मुलगी यांचे छत्र हिरावले. सोबतचा सहकारी मित्र आनंद ऊर्फ गोलू बाहकार हासुद्धा कुटुंबप्रमुख होता. तो मूळ अकोला जिल्ह्यातील कानशिवनी या गावातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून दर्यापूर येथील त्यांच्या मामाकडे राहत होता. त्यालासुद्धा वडील नसून आई आणि एक लहान बहीण त्याच्या पश्चात आहे. त्यांचेसुद्धा छत्र हरपले.
त्याच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. तिसरा सहकारी विनीत बिजवे यांच्या पाठीमागे आई व तीन बहिणी, असा आप्त परिवार आहे. विनीतसुद्धा कंत्राटी पद्धतीने आपला उदरनिर्वाह भागवीत होता. तर कुटुंबप्रमुख म्हणून त्याच्यावरती धुरा होती. एकंदरीत बघता तिन्ही युवकांना वडिलांचे छत्र नव्हते. तीनही मृतकांचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात झाले. तीनही युवकांची एकाच दिवशी अंत्ययात्रा निघाली. दर्यापूर येथील आशा-मनीषा मोक्षधाम येथे अग्नी देण्यात आला.