प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या प्रियकराच्या आईची प्रेयसीने केली भररस्त्यावर हत्या; हत्येपूर्वी चाकू अन् बुरखा घेतला विकत.

Oplus_131072
Spread the love

मेरठ:- प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या प्रियकराच्या आईची प्रेयसीने भर रस्त्यात हत्या केली आहे. गर्दीच्या वेळी प्रेयसीने प्रियकराच्या आईवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. तसंच हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही ताब्यात घेतला आहे. या दोघीही घरांमध्ये साफ-सफाईची कामं करायची, त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता.

आरोपी महिलेचे मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलासोबत प्रेम संबंध होते. यावरून दोघींमध्ये वारंवार भांडणं व्हायची. ज्यावेळी प्रेयसीने चाकूने हल्ला केला तेव्हा घटनास्थळी बरेच लोक होते. चाकूने वार केल्यानंतर महिला जखमी झाली, तेव्हा तिने मदतीसाठी विनवण्या केल्या, पण कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. प्रेयसीने प्रियकराच्या आईवर चाकूने एकामागोमाग एक सपासप वार केले.

ही घटना मेरठच्या मेडिकल पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगल पांडे नगरच्या एकता पार्क भागात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी एकता पार्क जवळ 30 वर्षीय सोनीने 42 वर्षांच्या दीपाली उर्फ दीपा यांची चाकूने भोसकून हत्या केली. प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे सोनीने दीपालीचा खून केला. दीपाली आणि सोनी दुसऱ्यांच्या घरांमध्ये साफ-सफाईची कामं करतात. संध्याकाळी दीपाली काम संपवून घरी येत होती, तेव्हा एकता पार्कच्या गेटवर सोनी उभी होती, तिने दीपालीला अडवलं, यानंतर दोघींमध्ये वादाला सुरूवात झाली. वाद वाढल्यानंतर सोनीने चाकूने दीपालीवर चाकूने हल्ला केला.

मदतीसाठी दीपालीचा आक्रोश

जखमी झालेली दीपाली मदतीसाठी पार्कच्या गेटमधून आत गेली, तिच्यामागे सोनीही गेली आणि चाकूने सपासप वार करू लागली. दीपालीने पार्कच्या गेटवर असलेल्या वॉचमनकडून मदत मागितली, पण सोनीच्या हातातला चाकू बघून कुणीही मदतीसाठी पुढे सरसावलं नाही. सोनीने चाकूने इतके वार केले की दीपालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी सोनीला अटक केली. तीन दिवसांपूर्वीच आपण चाकू विकत घेतला होता आणि दीपालीच्या हत्येची योजना आखली होती, असं सोनीने पोलिसांना सांगितलं.

हत्या करण्याआधी घेतला बुरखा

दीपालीचे टोमणे आणि अपमानामुळे आपण त्रासलेलो होतो, त्यामुळे तिचा काटा काढण्याचं ठरवलं, असा जबाब सोनीने दिला. दीपालीची हत्या करण्याआधी सोनीने काळ्या रंगाचा बुरखा घातला होता आणि चेहराही कपड्याने झाकला होता. या घटनेबद्दल मेरठ शहरचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे. दीपाली आणि सोनी यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. सोनी आणि दीपालीचा मुलगा विक्रम यांच्यात प्रेमसंबध होते, ज्याला दीपाली विरोध करत होती. याप्रकरणी विक्रम आणि त्याच्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांची चौकशी सुरू आहे, असं एसपी म्हणाले आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी