धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा भुसावळ पोलिसांनी केला पर्दाफाश;2 पिस्तूल,5 तलवारी,4 चाकू, 1फायटर,मिरचीपूड जप्त, सात संशयित आरोपींना अटक.

Spread the love

भुसावळ :- पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतूस, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत माहिती दिली आहे.

जळगावच्या भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, पाच तलवारी तसेच चार चाकू, एक फायटर आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. कृष्णात पिंगळे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी श्री. मंगेश बेंडकोळी, पो हे कॉ महेश चौधरी, पो ना सोपान पाटील, पो शि प्रशांत सोनार, पो शी भुषण चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि राहुल वानखेडे अश्यांनी केली आहे. वरील आरोपी यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास पो उप निरी श्री. मंगेश जाधव हे करीत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी