एरंडोल :- बांगलादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार,मंदिरांची होत असलेली तोडफोड,संपत्तीचे करण्यात येणारे नाकासानीचे निषेधार्थ सकल हिंदू समाज तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदार परदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.मूकमोर्चा तहसीलदार कार्यालयात पोहोचताच संतप्त झालेल्या
पदाधिका-यांनी बांगलादेशाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून हिंदू व त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची मागणी केली.मुकामोर्चात सहभागी झालेल्या हजारो महिला व पुरुषांनी दंडावर काळ्या फिती लाऊन बांगलादेश सरकारचा निषेध केला. पंचायत समिती कार्यालयापासून मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली.बांगलादेशात हिंदुंवर होणा-या अत्याचारात वाढ होत असून त्यांच्या संपत्तीचे नुकसान करण्यात येत आहे.हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या
मंदिरांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हिंदू महिला व मुलींवर अत्याचार करण्यात येत असून बांगलादेश सरकार याकडे दुर्लक्ष करून हल्लेखोरांना संरक्षण देत आहे.बांगलादेशात हिंदूंसह अन्य धर्मियांवरदेखील अत्याचार करण्यात येत आहेत.स्वामी चिन्मयदास यांचेवर खोटा गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत कठोर भूमिका
घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराबाबत मानवाधिकार आयोग का गप्प आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.मूकमोर्चा शांततेत पार पडला.मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.मुकमोर्चात युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर,कुणाल महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,आर.डी. पाटील, संध्या महाजन,शोभना साळी,प्रा.जी.आर.महाजन,विठ्ठल
वंजारी,रश्मी दंडवते,नंदा शुक्ला,आदेश तिवारी,योगेश महाजन,भूषण
बडगुजर,राहुल लोहार,अरुण साळी,ज्ञानेश्वर मराठे,विजय पाटील, दिलीप पांडे,advt.प्रेमराज पाटील,advt.अजिंक्य काळे.advt. आकाश महाजन,आरती ठाकूर यांचेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संळ्येने सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.