वडिलांच्या कोणत्या दवाखान्यात उपचार करायच्या, या कारणावरून आजी व नातू मध्ये झाला वाद; संतापलेल्या नातवाने केला आजीचा खून.

Oplus_131072
Spread the love

अक्कलकोट :- वडिलांना कोणत्या दवाखान्यात उपचार करायचे, या कारणावरून आजी व नातू यांच्यात झालेल्या वादावरून नातवाने कुऱ्हाड, दगडाने मारून आजीचा खून केला आहे. ही घटना कुरनुर (ता. अक्कलकोट) येथे सोमवार रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात निर्मला संतराव सुरवसे (वय ७०, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) मरण पावल्या आहेत.

या प्रकरणी सुमित सदाशिव सुरवसे (रा.कुरनूर ता.अक्कलकोट) हकिकत अशी की, यातील निर्मला सुरवसे आणि आरोपी हे नात्याने आजी-नातू असून सोमवार रोजी रात्री ९ वा.चे सुमारास निर्मला संतराव सुरवसे हिस आरोपी याने वडिलांवर कोणत्या दवाखान्यात उपचार करायचा, यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे.

याबाबत संतराम विठोबा सुरवसे, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुमित सुरवसे यास पोलिसांनी तत्काळ अटक करून येथील कोर्टासमोर उभे केले असता, त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पीएसआय पांडुरंग पवार हे करीत आहेत. घटनास्थळी डीवायएसपी विलास यामावर, पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि, नीलेश बागाव यांनी भेट देऊन पाहणी केली.

मुख्य संपादक संजय चौधरी