Viral Video: आता अनेक ठिकाणी यात्रा, जत्रा उत्सव साजरे होतील. यावेळी त्या त्या ठिकाणी मोठमोठे आकाशपाळणे लागतात, याच आकाश पाळण्यात बसायला तरुणाईची गर्दी दिसते. काही लोकांना रिस्क घ्यायला, अॅडवेंचर गेम्स खेळायला खूप आवडतात.हे गेम्स असे असतात की पाहून सर्वसामान्यांना चक्कर येईल. जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. असं म्हणतात की अशा खेळांमुळे एक प्रकारची किक मिळते, अंगात एक वेगळीच उंर्जा संचारते. तो एक प्रकारचा अविस्मरणीय अनुभव असतो असं म्हणा ना, मात्र हा अनुभव काही वेळेस जिवावर देखील बेततो. अशाच एक धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, लखीमपुर येथे एक मोठा आकाश पाळणा लागला होता. यामध्ये एक तरुणी बसली, मात्र जसा पाळणा फिरायला लागला तसा तिचा तोल जाऊ लागला. यावेळी ती पाळण्यातून खाली पडली. सध्या सोशल मीडियावर याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही तरुणी आकाश पाळण्यातून पडते आणि पाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर अकडकली जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण यात्रेचा परिसर दिसत असून जागोजागी अनेक आकाशपाळणे आहेत मात्र त्यात एका मोठ्या आकाशपाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर एक तरुणी लटकलेली दिसत आहे. संपूर्ण दृश्य पाहून तेथील प्रत्येकजण घाबरुन गेलाला आहे त्यात एका व्यक्तीने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आकाश पाळण्यात बसण्याआधी आता शंभर वेळा विचार कराल. या व्हिडीओही जोरदार व्हायरल होतोय.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @BmjJatav नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.