झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 3/ 2/2022 रोजी 3 मोटर सायकल चोरी गेल्या बाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच एका मोटर सायकल चोरास ताब्यात घेऊन बारामती एमआयडीसी परिसर व पुण्यामधून चोरीस गेलेल्या 8 टू व्हीलर बारामती तालुका पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. परंतु दिनांक 3/ 2/ 22 रोजी चोरीस गेलेल्या गाड्या यामध्ये मिळून न आल्याने पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे तपास पथक यांना सदर मोटरसायकल बाबत तपास करून लवकर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्या बाबत सूचना केल्या होत्या .
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगोटे साहेब तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक अमोल नरोटे ,रणजीत मुळीक व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांनी चोरून नेलेल्या मोटरसायकल शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालू केले होते. दिनांक 12/ 4/2022 रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व बार्शी जिल्हा सोलापूर येथून मोटारसायकल चोरी करणारे 1. आदर्श आप्पासाहेब कदम. वय -18 वर्ष रा. नारी ता.बार्शी जिल्हा सोलापूर 2. शिवशंकर वामनराव लबडे वय 18 वर्ष राहणार मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांना बार्शी जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले . व त्यांच्याकडून सदर चोरीस गेलेल्या चार टू व्हीलर गाड्या देखील रिकव्हर करण्यात आल्या आहेत.
याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 58/ 22 भादवि कलम 379 गुन्हा रजि. नंबर 77/ 22 भादवि कलम 379 गुन्हा रजि. नंबर 144 / 22 भादवि कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव जी देशमुख साहेब पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साहेब बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगोटे पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरोटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत ,नितीन कांबळे या सर्वांनी मिळून केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार रमेश भोसले व राम कानगुडे हे करीत आहेत.