जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळल्याने 5जवान शहीद; 10पेक्षा जास्त जवान जखमी

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात घडला आहे. मेंढर येथे नियंत्रण रेषेजवळ (LOC) सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन दरीत पडून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले आहेत. वाहनातून प्रवास करणारे अनेक सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी आहेत.मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.व्हाईट नाइट कॉपर्सने सोशल मिडिया एक्स वरून पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाला. यामध्ये भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांच्या प्रती आम्ही शोक व्यक्त करतो. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमीना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतीय लष्कराचे वाहन पूंछ सेक्टरमध्ये जवानांना कर्तव्यवर घेऊन जात असताना खोल दरीत कोसळले. हे वाहन 300 फुट खोलीत दरीत कोसळले आहे. पूंछ जिल्ह्यातील बलनोई या भागात ही घटना घडली. हा परिसर एलओसीच्या जवळच येतो. लष्कराचे वाहन सैनिकांना घेऊन त्यांच्या पोस्टकडे चालले होते. यावलेस वाहन खोल दरीत जाऊन कोसळले.लष्कराचे वाहन जवळपास 300 फुट दरीत कोसळले आहे. वाहन अचानक अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाहनात अनेक सणीक प्रवास करत असल्याचे समोर येत आहे. या दुर्घटनेत भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 10 पेक्षा जास्त जवान जखमी झाल्याचे कळते आहे. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी लष्कराचे पथक पोहोचले आहे. वेगाने बचावकार्य सुरू आहे. काळोख झाल्याने बचावकार्यात थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. जखमी जवानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात देखील झाला होता अपघात

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्करी वाहन उलटल्याने एक जवान शहीद झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. कुलगाममध्ये ऑपरेशनल मूव्ह दरम्यान हा अपघात झाला. ही दुर्घटना कुलगामच्या दमहल हांजीपोरा येथे गुरुवारी रात्री घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराचे एक वाहन पलटले, त्यात एक सैनिक शहीद झाला आणि आठ जण जखमी झाले होते.

ऑगस्टमध्ये लडाखमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून अपघात
केंद्रशासित लडाखमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या (Army Vehicle Accident) वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहनजीक असलेल्या क्यारी गावात सैन्याचे एक वाहन दरीत कोसळल्याची घटना घडली होती. शहीद जवानांमध्ये आठ जवान आणि एका जेसीओचाही समावेश होता.

मुख्य संपादक संजय चौधरी