एरंडोल :- पतीशी आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या तेहतीस वर्षीय महिलेने तसेच तिच्या नऊ वर्षीय मुलीने राहत्या घराच्या तिस-या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जहांगीरपुरा भागात घडली.आई व मुलीने एकाचवेळी गळफास घेवून जिवन संपवल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी,की जहांगीरपुरा भागातील सपना प्रकाश माळी (वय ३१) व केतकी माळी (वय-९) यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मानसिक तणावातून एकाचवेळी राहत्या घराच्या तिस-या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली.सपना माळी यांचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला असल्यामुळे त्या कायम तणावाखाली राहत होत्या.सपना माळी यांचे भाऊ राहुल प्रकाश माळी हे दुपारी चुलत भाऊ मोहन माळी यांचेकडे गेले होते.दुपारी साडेतीन वाजेच्या राहुल माळी हे घरी आले असता त्याना बहिण सपना माळी व भाची केतकी माळी न दिसल्यामुळे ते घराच्या तिस-या मजल्यावर गेले.घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा आतून बंद होता.त्यांनी बहिण व भाचीस आवाज दिला असता कोणताही
प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी चुलत भाऊ मोहन माळी यांना मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली.मोहन माळी त्वरित राहुल माळी यांच्या घरी आले आणि त्यांनी कारागिरास बोलाऊन घराचा दरवाजा तोडला असता त्यांना बहिण सपना माळी व भाची केतकी माळी यांनी घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून
आल्याने त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले.राहुल माळी व मोहन माळी यांनी कृणाल चौधरी हेमराज महाजन यांचेसह गल्लीतील रहिवाशांच्या मदतीने दोर कापून दोघांना खाली उतरवले व तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता दोघेही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी
सांगितले.सपना माळी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरण्यात येवू नये असा मजकूर लिहिला आहे.याबाबत राहुल माळी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस तपास करीत आहेत.मानसिक तणावात महिलेने नऊ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.आई व मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचेवर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.