सोलापूर :- कोण वक्ती कसा विचार करतो याचा काही नेम नाही. त्यातून मोठे गुन्हे ही होत आहेत. अशीच एक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. खाजगी शिवकवणी घेणाऱ्या शिक्षकाने असं काही कृत्य केलं की त्यामुळे त्याचं संपुर्ण कुटुंबच हादरून तर गेलच पण उद्धवस्तही झालं.अनंत साळुंखे असं त्या खासजी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे.भांडणाला कोणतही कारण लागतं नाही. त्याचाच प्रत्यय सोलापूरमध्ये झालेल्या घटनेत दिसून येतो. ‘तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे,’ असा आक्षेप अनंत साळुंखे याचा आपल्या पत्नीवर होता. यावरून तो सतत पत्नी बरोबर भांडण करत होता. पत्नी मनिषा यांनाही आपले पती असं का म्हणत आहे याची कल्पना नव्हती. त्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण पतीच्या डोक्यात ती एकच गोष्टी फिट झाली होती.या रागातूनच पती अनंतने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने पत्नीला व मुलाला गाडीवर बसवून शेतात नेले.तिथे त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळला. त्यावर त्याचे मन भागले नाही. त्याने तिच्यावर चाकूने वार केले. पुढे तर दगडाने तिला ठेचले. त्याच तिचा मृत्यू झाला. पत्नाची खून केल्यानंतर त्याने आपला मोर्चा मुलाकडे वळवला. त्याने मुलावरही चाकूने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला.हा सर्व प्रकार बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी शिवारात घडला आहे. यात मनीषा अनंत साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाल्या. त्या अनंत साळुंखेच्या पत्नी होत्या. तर त्यांचा मुलगा तेजस अनंत साळुंखे हा या हल्लात जखमी झाला आहे. या प्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक केली आहे. या हत्ये मागे आणखी कोणते कारण आहे का याचा शोध ही पोलिस घेत आहेत.