डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.मिरवणूकीने नागरिकांचे वेधले लक्ष.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती,पंचशील मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.

शहरात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व शैक्षणिक संस्था,शासकीय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सायंकाळी सात वाजता पंचशील मित्र मंडळ आणि उत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.शहरातील प्रमुख मिरवणूक जाणा-या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.मिरवणुकीत महिलांची उपस्थित लक्षणीय होती.कोरोनाच्या संकटांमुळे दोन वर्षानंतर मिरवणूक काढण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.यावेळी डॉ.राजेंद्र चौधरी,advt.ओम त्रिवेदी,advt.नितीन चौधरी,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल सोनावणे,उपाध्यक्ष प्रथमेश गायकवाड,डॉ.अतुल सोनावणे,भैय्या अहिरे,कैलास गायकवाड,प्रेमराज गायकवाड,पंकज बेहरे,विजय गव्हाणे,प्रविण बाविस्कर, आकाशअहिरे,सुनीत शिरसाठ,मोहन सैंदाणे,सिद्धार्थ गायकवाड,प्रसन्नजीत सोनवणे,नरेंद्र सेदाण,लखन बनसोडे,नितीन बोरसे,अजय सोनवणे,सतीश सोनावणे,साहेबराव सपकाळे,संघरत्न गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक शरद बागल,उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील,पंकज पाटील,अकिल मुजावर,संदीप पाटील,विकास खैरनार,सुनील लोहार,संतोष चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

   

न्यू इंग्लिश स्कूल- येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्या सरला विंचूरकर,उपप्राचार्या सरिता पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिला.कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नांदखुर्द येथे कार्यक्रम-नांदखुर्द आणि नांदखुर्द बुद्रुक (ता.एरंडोल) येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पवार आणि प्रशासक देवराज यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यक्रमास कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष विनायक पगारे,तंटामुक्ती समितीचे सदस्य मिलिंद बनसोडे,रोजगार हमी योजनेचे सदस्य रामभाऊ सोनावणे,राजेंद्र मैराळे यांचेसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी-एरंडोल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करतांना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव त्यांचेसोबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,शालिग्राम गायकवाड.

टीम झुंजार