नवी दिल्ली : लग्नानंतर विवाहबाह्य संबंध, दुसऱ्या कुणासोबत तरी पळून जाण्याची काही प्रकरणं आहेत. पण एक असं प्रकरण ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. तुम्हाला विश्वास बसणार एक महिला लग्नानंतर 18 वर्षांत तब्बल 25 वेळा घर सोडून पळून गेली आहे.आता वैतागलेल्या नवऱ्याने पोलिसात धाव घेतली आहे.
उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या किला भागात राहणारा अफसर अली हा दिल्लीत टॅक्सी चालक आहे. अफसर अलीचं 2006 साली त्याचं रुबी खान नावाच्या महिलेसोबत लग्न झालं. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत सर्व काही सुरळीत होतं. पण नंतर रुबी घरातून पळून जाऊ लागली. छोट्या छोट्या गोष्टीवरून ती त्याला त्रास देऊ लागली. भांडण करू लागली. लग्नानंतर 18 वर्षांत ती 25 वेळा भांडण करून घरातून निघून गेली. आता मात्र पतीने पोलिसात धाव घेतली आहे. आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असून ते वाचवा अशी मागणी त्याने पोलिसांकडे केली आहे.
अफसर अली एसएसपी कार्यालयात पोहोचला. त्याने पत्नीने आपल्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. माझ्या पत्नीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, असं सांगितलं. तो म्हणाला, माझ्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. माझी पत्नी रुबी खान हिच्यामुळे गेल्या 18 वर्षांपासून मी मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करत आहे. माझ्या पत्नीने 18 वर्षांत 25 वेळा तिच्या घरी जाऊन माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली आहे. एवढंच नाही तर माझ्यावर हुंडा आणि खर्चाची केसही केली आहे. ज्यासाठी मला दिल्लीहून वारंवार बरेली कोर्टात यावं लागतं. मी जितके पैसे कमवतो ते सगळे कोर्टातच खर्च होतात.
जेव्हा ती पळून गेली तेव्हा प्रत्येक वेळी नवीन समस्या निर्माण होते, असं त्याचं म्हणणं आहे. तसंच पत्नी रूबीने कोर्टाच्या माध्यमातून मुलगी अलिना हिचा ताबा घेतला. पण ऑक्टोबर 2023 मध्ये अलीनाने नोएडाहून तिच्या वडिलांना फोन करून आपल्याला आईने घरातून हाकलून दिल्याचं सांगितलं. आता माझ्या पत्नीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्याने केली आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले