पत्रकार समाजाचे तिसरा डोळा असतात.:- प्रा.मनोज पाटील; छत्रपती क्रीडा प्रसारक मंडळातर्फे पत्रकारांचा सत्कार.

Spread the love

एरंडोल :- सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणारे पत्रकार समाजाचा तिसरा डोळा म्हणून कार्य करीत असतात असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांनी केले.छत्रपती क्रीडा प्रसारक मंडळ,प्रा.मनोज पाटील मित्र मंडळ,गुरु हनुमान व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी
अध्यक्षस्थानी होते.यावेळी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून
कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रा.मनोज पाटील यांनी पत्रकार समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करत असल्याचे सांगितले.सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवेचे कार्य पत्रकार असून त्यांनी आपल्या लेखणीतून समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी,शरद महाजन,दिनेश
चव्हाण,कैलास महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.भानुदास आरखे यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास आल्हाद जोशी,कमलअली सय्यद,प्रा.सुधीर शिरसाठ,पंकज महाजन,कुंदनसिंग ठाकूर,प्रकाश शिरोळे,रतिलाल पाटील,चंद्रभान पाटील,देविदास सोनवणे,आबा महाजन,राजू ठक्कर,नितीन पाटील,दीपक बाविस्कर,उमेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष बबलू चौधरी,बाळासाहेब पाटील,शाम जाधव, पंकज पाटील,अतुल मराठे,उल्हास लोहार,प्रा.मयूर जाधव,सुशील
पाटील,प्रशांत निळे,निखील पवार,गोपाल पाटील,अनिल आरखे, संजय कुंभार,सागर गोसावी,भूषण चौधरी,चेतन मराठे,चंद्रशेखर वाघ,रोहित राजपूत,राज पाटील,मयूर मराठे,अनिल मराठे,अनिल भोई,पंकज पाटील,नागराज न्हावी,ऋषिकेश पाटील,दिलीप
सोनवणे यांचेसह पत्रकार उपस्थित होते.छत्रपती क्रीडा प्रसारक मंडळाचे पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

मुख्य संपादक संजय चौधरी