सत्यशोधक समाज संघाकडून सत्यशोधिका ललिता वाघ यांचा शाल-ग्रंथ देऊन सन्मान !
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगांव : जगातील सर्वोत्तम मातृत्व-कर्तृत्व-नेतृत्व, कुळवाडीभूषण-बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शक, गुरु, स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
३ जानेवारी सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधत सावित्री शक्तीपीठ पुणे, यांच्या वतीने सत्यशोधिका ललिता राजेंद्र वाघ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले होते. आज माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यात आला. सत्यशोधक समाज संघ धरणगाव यांच्याकडून सौ.ललिता वाघ व राजेंद्र वाघ यांचा सपत्नीक शाल, पी डी पाटील लिखित आदर्श महामाता व जगद्गुरु तुकोबाराय यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, संघटक लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, एच डी माळी, सुनील देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योती पाटील, वेणु पाटील यांसह शहरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.