लव्ह जिहाद! एका पोलिसाने अमित असे नाव सांगून हिंदू युवतीसोबत ठेवले प्रेमसंबंध, बनविले अश्लील व्हिडिओ, धर्म परिवर्तनासाठी दबाव, अन् ५५ लाख ₹ उकळले.

Spread the love

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बादशाह खान नावाच्या पोलीस शिपायावर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात त्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. कट्टरपंथी बादशाहने आपले नाव अमित असे सांगत एका हिंदू युवतीसोबत प्रेमसंबंध ठेवले.संबंधित हिंदू युवती ही पारिचारिकेचा कोर्स करत असल्याचे याप्रकरणातून समोर आले. तसेच तिच्यावर शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला असल्याचे पीडितेने लखनऊ येथील चिन्हाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ही घटना लखनऊ येथील चिन्हाट पोलीस ठाणे परिसरात घडली. पीडित युवती ही मूळची शाहजहानपूरची असून, ती एका महाविद्यालयात नर्सिंगचा अभ्यास करत होती. सोमवारी ३० डिसेंबर २०२४ रोजी पीडितेने शाहजहापूर जिल्ह्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल बादशाहाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेने तक्रारीत म्हटले की, ती २०१४ मध्ये बादशाह खानला भेटले होते. तेव्हा बादशाहने अमित असे नाव सांगत तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले.

पीडितेने यासंबंधित सांगितले की, बादशाह खान तिला तिला अनेक ठिकाणी घेऊन गेला. २०१५ मध्ये बादशाह खानची यूपी पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी नियुक्ती झाली होती. पोलीस पदावर सक्रिय झाल्यानंतर बादशाह खानने एका मुस्लिम युवतीसोबत विवाह केला. याप्रकरणाची माहिती पीडितेला झाली. यानंतर बादशाहने आपण आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली असल्याचे सांगितले.यानंतर बादशाहने पीडितेच्या महाविद्यालयाभोवती फेऱ्या मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिच्यावर सलग ६ वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला विवाह करण्यास दबाव आणण्यात आला होता. त्यानंतर पीडितेने बादशाहला ऑनलाईन माध्यमातून ५० हजार रूपये दिले होते. त्यावेळी ऑनलाईन बिमअॅपवर बादशाह खान असे नाव आल्यानंतर बादशाह खान मुस्लिम असल्याची तिला भनक लागली. यावेळी तिने बादशाह खानला यासंबंधित प्रश्न केला असता तिला बादशाहने इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला. यावेळी बादशाहच्या पत्नीने मुस्लिम समाजात ४ बायका ठेवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे आता तु मुस्लिम झाल्यास बादशाह तुझ्याशी निकाह करेल असे बादशाहची पत्नी म्हणाली.

सध्या बादशाहला एक मुलगा आहे. मात्र बादशाह पीडितेला ब्लॅकमेल करणे २०२४ पर्यंत सरूच होते. २७ डिसेंबर २०२४ रोजी खानने पीडितेकडे १० लाखांची मागणी केली. त्यावेळी तिने नकार दिला. याबाबत पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बादशाहने पीडितेचा फोन अनेकदा ट्रेस केला. त्याने पीडितेचा याप्रकरणी दावा आहे की, बादशाह खानने आतापर्यंत तिच्याकडून सुमारे ५५ लाख रूपये उकळले आहेत. याप्रकरणात बादशाह खानचे भाऊही असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

तक्रारीत शेवटी पीडितेने सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. आलेल्या पुराव्यानिशी तथ्यांची कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी