पिकअप अन् आयशरचा भीषण अपघातात, टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्याने ८ जणांच्या मृत्यू, १३ जखमी.

Spread the love

नाशिक :- नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेल्या आठ कामगारांचा दुर्दैवी अंत झालाय. अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची दिली माहिती डॉक्टरांनी आहे.निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे सर्वजण हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

द्वारका उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला पाठीमागून जोरात धडकला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. यामुळे सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरुन जात होता. या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा तत्सम कुठलेही निशाण लावलेले नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. त्यामुळे टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजुला आदळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातग्रस्त सिडको, अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.दरम्यान, अपघाताच्या काहीवेळापूर्वीच टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांमध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातामधील मृतांची आणि जखमींचे नावे खालीलप्रमाणे…
मृतांची नावे :

१) अतुल संतोष मंडलिक (वय 22)
२) संतोष मंडलिक (56)
३) यश खरात
४) दर्शन घरटे
५) चेतन पवार (वय 17)
इतर जिल्हा रुग्णालयातील एक आणि खाजगी मधील दोन मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
जखमींची नावे :

  1. सार्थक (लकी) सोनवणे
  2. प्रेम मोरे
  3. राहुल साबळे
  4. विद्यानंद कांबळे
  5. समीर गवई
  6. अरमान खान
  7. अनुज घरटे
  8. साई काळे
  9. मकरंद आहेर
  10. कृष्णा भगत
  11. शुभम डंगरे
  12. अभिषेक
  13. लोकेश
मुख्य संपादक संजय चौधरी