नवरदेवाने लग्नापूर्वी नवरीला घेवून दिले साड्या दागिने लग्नाच्या दिवशी लग्न समारंभ सुरू असताना टॉयलेटचा केला बहाणा, नवरी पैसे-दागिने घेऊन फरार

Spread the love

गोरखपूर (उत्तर प्रदेश) :- मध्ये एक अनोखी घटना घडली आहे. लग्नाच्या विधींमध्ये टॉयलेटच्या बहाण्याने रोख रक्कम आणि दागिने घेऊन नववधू फरार झाली. हे लग्न जुळविण्यासाठी एका व्यक्तीने 30 हजार रुपये घेऊन जमवले होते.ही घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील आहे. एका 40 वर्षीय शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाल्याने तो दुसऱ्या लग्नासाठी वधूच्या शोधात होता. एका व्यक्तीने सुरेशकडून 30 हजार रुपये घेऊन त्याचे लग्न जुळवले. त्याने लग्नापूर्वीच होणाऱ्या पत्नीला साड्या, दागिने आणि लग्नाचा इतर खर्च दिला. त्यानंतर कुटुंबियांसोबत तो लग्न करण्यासाठी मंदिरात पोहोचला. तिथे नववधू तिच्या आईसोबत होती. लग्नाच्या विधी सुरु होताच नववधूने टॉटलेटला जाण्याचा बहाणा केला आणि पुन्हा परतलीच नाही. जाताना रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. त्याच दरम्यान तिची आईपण गायब झाली आहे.

नवरदेव माध्यमांशी बोलताना म्हणाला की, मी माझा संसार पुन्हा मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व काही लुटले आहे. याप्रकरणी गोरखपुरचे एसपी जितेंद्र कुमार म्हणाले की, याप्रकरणाची अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेची तक्रार आल्यास प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

मुख्य संपादक संजय चौधरी