एरंडोलला रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.१९९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Spread the love

एरंडोल :- येथील स्वामी विवेकानंद केंद्र,योगेश्वर नागरी सहकारी
पतसंस्था,जळगाव येथील माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती,राजमाता जिजाऊ जयंती व योगेश्वर पतसंस्था वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १९९ नागरिकांनी रक्तदान केले.विवेकानंद केंद्राच्यावतीने सर्व रक्तदात्यांना विवेक शलाका २०२५ हि नवीन वर्षाची डायरी व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी दहा वाजेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील कासोदा,म्हसावद, पारोळा, पिंपळकोठा,जवखेडा,सोनबर्डी येथील रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला.रक्तदान शिबिरासाठी शहरातील दानशूर व्यक्ती तसेच बुलढाणा अर्बन सोसायटी यांनी सहकार्य केले.माजी आमदार चिमणराव पाटील यांनी शिबिरास भेट देवून समाधान व्यक्त केले.

रक्तदान सर्वात मोठे दान असून रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे सांगितले.रक्तदानाविषयी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश चौधरी,दंतरोग तज्ञ डॉ.मकरंद पिंगळे,डॉ.अमेय राठी,युवा उद्योजक नरेंद्र पाटील,पत्रकार आबा महाजन,कुंदनसिंग ठाकूर,दिनेश चव्हाण यांचेसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी
व महिलांनी रक्तदान केले.विवेकानंद केंद्राच्यावतीने तेरा वर्षांपासून
रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे प्रा.जी.आर. महाजन यांनी सांगितले.

या शिबिरास डॉ.पांडुरंग पिंगळे,माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्राचे प्रमुख भानुदास येवलेकर,जनता बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,दिनेश महाजन,राजेंद्र शिंदे,डॉ. राहुल पाटील,वंदना कुलकर्णी,संगिता पाटील,प्रकाश पाटील,कुंदन बदहुजार,ईश्वर पाटील, डॉ.उज्वला राठी,शोभा साळी,रश्मी दंडवते यांचेसहपदाधिका-यांनी भेट दिली.

गोळवलकर रक्तकेंद्राचे डॉ.मकरंद वैद्य,सुनील पाटील,उज्वला पाटील,जागृती लोहार,श्रीकांत मुंडले,विजय कुलकर्णी,उदय सोनवणे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.शिबिरास प्रा.जी.आर.महाजन,नरेंद्र डागा,आर.डी.पाटील,प्रसाद दंडवते,डॉ.नरेंद्र पाटील,प्रकाश पाटील,शैलेश पाटील,योगेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक मंगेश पाटील,दीपक पाटील,राजेंद्र पाटील, संजय सूर्यवंशी मंगेश पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी