आठवडे बाजार पूर्वीच्या जागेवर भरवण्यात यावा. एरंडोल पोलीस प्रशासनाची सुचना.

Spread the love

एरंडोल :- शहरातील आठवडे बाजार पूर्वीच्या मरीमाता मंदिर परिसर,म्हसावद नाका,अंजनी नदी पात्रालगत व नवीन आठवडे बाजारात भरवण्यात यावा अशी सुचना पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी सर्व विक्रेत्यांना केली आहे.आठवडे बाजार एरंडोल-नेरी राज्य मार्गावर भरवल्यास संबंधित विक्रेते,व्यावसायिक
यांचेविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी दिला आहे.शहरात दर रविवारी आठवडे बाजार भरत असतो.शहरासह ग्रामीण भागातील

शेकडो व्यावसायिक तसेच हजारो ग्राहक बाजारात येत असतात. सुमारे चार कोटीरुपये खर्च करून सर्व सोयींनीयुक्त असलेल्या नवीन आठवडे बाजाराचे बांधकाम करण्यात आले आहे.सद्यस्थितीत सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आठवडे बाजार धूळ खात पडला असून याठिकाणी गांजा,भांग पिना-यांची
वर्दळ दिसून येते.नवीन आठवडे बाजाराचे बांधकाम सुरु असतांना
विक्रेत्यांसाठी रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालय परिसर,नेरी जामनेर राज्यमार्गावर तात्पुरता आठवडे बाजार भरवण्याची परवानगी देण्यात आली होती.नेरी मार्गावरील धरणगाव चौफुली ते म्हसावद नाक्यापर्यंत बेशिस्तपणे बाजार भरवला जात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असतात.आठवडे बाजाराचे
बांधकाम पूर्ण होऊन सुमारे तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटून देखील याठिकाणी आठवडे बाजार भरत नाही तर नेरी राज्यमार्गावर दोन्ही बाजूस विक्रेते व्यवसाय करीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.रस्त्याच्या दोन्ही बाजूस विक्रेते व ग्राहक यांची वर्दळ राहत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. रस्त्यावरच विक्रेते व ग्राहक यांची गर्दी होत असल्यामुळे अनेकवेळा किरकोळ वाड निर्माण होत असतात.आठवडे बाजाराच्या दिवशी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत असते त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात.नवीन आठवडे बाजाराचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये असलेल्या गाळ्यांचे लिलाव
देखील करण्यात आले आहे मात्र आठवडे बाजार नियोजित ठिकाणी न भरवता विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करीत असतात. प्रमुख राज्यमार्गावर आठवडे बाजार भरत असतांना पालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आठवडे बाजाराकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी,कोणत्याही क्षणी होणारी दुर्घटना लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने सर्व व्यावसायिक, विक्रेते यांना आठवडे बाजार पूर्वीच्याच जागी भरवण्याची सुचना केली आहे.जे व्यावसायिक,विक्रेते रविवार या आठवडे बाजाराच्या दिवशी एरंडोल नेरी राज्य मार्गावर व्यवसाय करतील असा
विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी दिला आहे.दरम्यान पोलीस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी