एरंडोल – एरंडोल शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संयुक्त जयंती निमित्ताने माता रमाबाईआंबेडकर बहुउद्देशीय संस्था एरंडोल,छत्रपती फुले शाहू आंबेडकर नगर,या तर्फे आयोजित- फुले-आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त भव्य गीत गायनाचा सुंदर कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक उषाकिरण खैरनार मॅडम प्रा. भरत शिरसाठ ,प्रा.विजय गाढे,प्रा.उमेश सूर्यवंशी, सामजिक कार्यकर्ते ईश्वर बिऱ्हाडे,धनंजय खैरनार, कृष्णा ओतरी,प्रकाश शिंदे, रवी बोरसे,नितीन बोरसे, यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुनिल खोकरे म्युझिशियन ग्रुप तर्फे विविध छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील व कार्याचा गौरव करणारे गीतांचा भव्य जुगलबंदी कार्यक्रम खान्देश प्रसिद्ध गायक प्रा.उमेश सूर्यवंशी व गायक नितीन खोकरे यांनी दमदार गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली.यावेळी विविध समाज बांधव बाहेरगावाहून कार्यक्रमाला उपस्थित होते.आयोजक छत्रपति फुले शाहू आंबेडकर नगर एरंडोल,यासाठी ब्ल्यू बॉईज फाउंडेशन,जयभिम ग्रूप विखरन,रमाबाई आंबेडकर नगर एरंडोल,भिमजन्मोउत्सव समिती,यांचे सहकार्य लाभले????????