जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडीजवळ एका पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना समोर आली असून कंटेनर पार्क करत असताना खांबाला धडकल्याने कंटेनरमध्ये मध्ये विद्युतप्रवाह उतरून विजेचा जोरदार धक्क्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे
जगदीश सिंह बोरा (वय ३८ रा. पिथोरागड उत्तराखंड) असं ट्रक चालकाचं नाव असून तो आर .जे ०९ जी.सी २५९७ या क्रमांकाचा कंटेनर घेऊन जळगाव वरून जात होता. दरम्यान सकाळी खेडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर तो थांबला. या पेट्रोल पंपावर एका बाजूला आपला कंटेनर उभा करत असताना पेट्रोल पंपाला लागूनच असलेल्या एका वीज खांबाला तसेच खांबावरील डीपीला कंटेनरचा धक्का लागला.
आवाज आल्याने चालक जगदीश हा कंटेनरच्या खाली उतरला पुन्हा कंटेनरमध्ये मध्ये बसण्यास केला असता यादरम्यान डीपीवर ही स्फोट झाला व विजेच्या जोरदार धक्क्याने जगदीश हा जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या आवाज झाल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळवली . त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील आधार कार्ड वरून मयत चालकाची ओळख पटली व त्याचे नाव जगदीश बोरा असल्याचे समोर आले. मयताच्या उत्तराखंड येथील कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते जळगाव कडे रवाना झाले आहेत. प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे