संपत्तीसाठी सख्ख्ये भाऊ झाले पक्के वैरी! तिघ भावांनी मिळून उचलं टोकाचं पाऊल अन् जे केलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसले.

Oplus_131072
Spread the love

लातूर :- सर्वांना हादरवून टाकणारी एक घटना लातूर जिल्ह्यातील उस्तुरी इथं घटली आहे. जे सख्खे भाऊ लहान पणापासून एकत्र असतात. जीवाला जीव देतात. तेच संपत्तीसाठी एकमेकांचा जीव घेत असतील तर? असचं काहीसं लातूरमध्ये घडलं आहे.हे प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसले. संपत्ती मिळाली यासाठी ऐवढं टोकाचं पाऊल कुणी उचलतं का असा प्रश्न तुम्हालाही पडेल. संपत्ती समोर मग नातंही दिसत नाही. पैस हेच सर्वस्व मानलं जातं. याचीच प्रचेती आणून देणारं हे प्रकरण म्हणावं लागेल.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात उस्तुरी हे गाव आहे. या गावात बिराजदार कुटुंब राहातं. सुरेश बिराजदार, बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार हे चौघे सख्खे भाऊ या गावात राहातात. त्यांची वडीलोपार्जित शेती याच गावात आहे. याच शेतीच्या वाट्यावरून या चौघांमध्ये सतत वाद होत होते. त्यातून परस्पर विरोधी पोलिस तक्रारी ही करण्यात आल्या होत्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गावातल्या काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळासाठी का होईना त्यांची समजूत काढण्यात आली होती. पण ही स्थिती फार काळ टिकली नाही.

शेतीत हिस्सा मिळाला यासाठी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार या तिघा भावांनी सुरेशला जाब विचारण्याचा निर्णय घेतला. सुरेश आपला मुलगा गणेश आणि साहिल सह शेतावर काम करत होता. त्याच वेळी सुरेशचे तिन्ही भाऊ शेतात धडकले. त्यावेळी त्याला काही समजण्या आत या तिघांनीही लाठ्या काठ्यांनी सुरेश आणि त्याच्या दोन मुलांना मारायला सुरूवात केली. यातून वाचण्याचा बाप लेकांनी प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. बसवराज, सुनिल आणि लखनच्या डोक्यात सनक गेली होती. त्यांनी आपल्याच भावाचा मुडदा पाडला. ते कमी म्हणून की काय आपल्या पुतण्याचा ही खून केला.सुरेश बिराजदार यांचा या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांचे वय 50 वर्षे होते. तर त्यांचा मुलगा साहिल याचाही या मारहाणीत ठार झाला. तो 22 वर्षाचा होता. तर दुसरा मुलगा गणेश हा जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याला इतकी जबर मारहाण झाली होती की त्याला लातूरला हलवण्यात आले.

दरम्यान या हत्या केल्यानंतर सुरेशचे तिघे ही भाऊ तिथून पळून गेले. त्यांनी सख्ख्या भावा बरोबरच पुतण्याचीही हत्या केली होती.या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजु हिंगमिरे, बळीराम म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मारेकरी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले. तर या प्रकरणी गुन्हा कासार शिरसी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या हत्याकांडाने संपुर्ण लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संपत्तीसाठी ऐवढं टोकाचं पाऊल कसं कुणी उचलू शकतं असा प्रश्नही या निमित्ताने चर्चीला जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी