“तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.

Spread the love

जळगाव : – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. “गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि आव्हाणे गावाचे रहिवासी सुनील चौधरी होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार !

यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे चेअरमन मंगल पाटील, सरपंच भारती भगवान पाटील, विलास चौधरी, भगवान पाटील वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार शाल, श्रीफळ, गुलाबांच्या फुलांचा मोठा हार घालून फटाक्यांच्या आतषबाजीत केला. तसेच याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आव्हाणे गावाचे रहिवासी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी, आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य असलेले डॉ. संदीप जोशी व डॉ. मयुरी जोशी या दाम्पत्याचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच छगन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक डॉ.संदीप पवार सर यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव रुपसिंग चौधरी यांनी मानले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, सरपंच भारती पाटील, विलास चौधरी उर्फ किटूनाना, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे चेअरमन मंगल पाटील, सचिव रूपसिंग चौधरी, डॉ.संदीप जोशी, डॉ.मयुरी जोशी, श्रीराम जाधव, कॅथरीन जाधव, भगवान पाटील, ह.भ.प.आवरकर महाराज, राजू पाटील, छगन पाटील, जानकीराम पाटील, माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती राजेन्द्र चव्हाण, मुकुंदराव नन्नवरे, रमेश आप्पा पाटील, आशुतोष पाटील, कुंदन काळे, राकेश चौधरी, उमाकांत चौधरी, जितू पाटील, दिलीप पाटील, वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील, अशोक पाटील, अहिल्याबाई होळकर ग्राहक भंडारचे पदाधिकारी वसंत साबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच वि.का.स.सोसायटीचे संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवसेनेचे, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी