भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त

Spread the love

भडगाव प्रतिनिधी:- गिरणा नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून ते ट्रॅक्टर द्वारे जागो जागी वाळूचे थप्पे मारून त्या ठिकाणाहून डंपरद्वारे पाचोरा,पारोळा,एरंडोल, या ठिकाणी घेऊन जात असताना आज सकाळीच महसूल विभागाच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी मौजे टोणगांव येथुन एक तर मौजे भडगांव पेठ येथुन एक असे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त करण्यात आले आहे. यापैकी एक डंपर शासकीय आय. टी. आय येथे तर दुसरे डंपर तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.

या दोन्ही डम्परांवर महसूल विभागाची दंडात्मक कारवाई, पोलिसात गुन्हा व आरटीओकडे हे वाहन वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार श्रीमती शितल सोलाट यांनी दिली. हि कारवाई तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, राहुल पवार, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, दिनेश येंडे, राहुल माळी, वाहन चालक लोकेश वाघ यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी