अमळनेर :- येथील एमपीडिएतून सुटून आलेल्या विशाल चौधरी याच्या वर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, अमळनेर मधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल चौधरी याला एमपीडिए कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र तो दि १ रोजी एमपीडिए कारवाईतून सुटून आला आहे. तो काल दि ३ रोजी बाजार समितीच्या आवारात दुपारच्या वेळेस कामासाठी आला असता त्याला सात ते आठ जणांनी मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक विकास देवरे – जखमी विशाल चौधरी च्या जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येणार आहे.सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करू नये.