धरणगाव | प्रतिनिधी :- डॉक्टर असोसिएशन हे धरणगावच्या वैद्यकीय सेवेसाठी महत्वपूर्ण भूमिका निभावत असून कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या सेवेला तोड नाही. संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचे कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर अनंत उपकार आहेत. धरणगाव डॉक्टर असोसिएशनने केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. शहरातील आणि तालुक्यातील वैद्यकीय समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करू. धरणगावच्या वैद्यकीय सुविधांसाठी 40 कोटी निधी मंजूर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
कॅबिनेट मंत्रीपदी आणि जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार डॉक्टर असोसिएशन मार्फत शाल, बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मनोज अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन पेंढारे यांनी केले. तर डॉ.धिरज वाजपेयी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यांची होती उपस्थीती
यावेळी डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. प्रशांत भावे, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. मयुर जैन, डॉ. अतुल शिंदे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. रमेश कट्यारे, डॉ. नरेंद्र पाटील आदी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक विजय महाजन, बुट्या पाटील, अहमद पठाण व शिवसेनेचे पदाधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.