माझ्या आयुष्यात पाच ते सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे; सोशल मीडियावर पोस्ट करत एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपवलं जीवन.

Spread the love

बीड :- चिंचवडगाव गावातील २८ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.उमेश शेंडगे पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. उमेश याचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याचे हे प्रेम एकतर्फीच होते. उमेश याने या प्रेमातून टोकाचे पाऊल उचलले आहे.

शेतात जाऊन उमेशने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. दरम्यान त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट आणि एका मुली सोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच त्याच्या बाबतीत घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. मात्र या घटनेने खळबळ उडाली असून एकतर्फी प्रेमातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांना व मित्र परिवाराला धक्का बसला आहे.

उमेशने आत्महत्या करण्यापूर्वी समाज माध्यमावर भावनिक पोस्ट केली आहे. ही पोस्ट लिहिताना त्याने,’ माझ्या आयुष्यात पाच / सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे.., असे म्हणून पोस्ट लिहायला सुरुवात केली आहे. यानंतर त्याने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती लिहिली आहे. तर समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये अनेकांच्या प्रकरणाचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी