भयंकर निर्दयीपणा: सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून केला खून

Spread the love

पुणे – अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा सलग तीन दिवस मारहाण करत भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथे श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुलीच्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 24 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.त्यानूसार जितेंद्र उत्तम पाटील(33) यास अटक करण्यात आली आहे. पाटील हा एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिलेचा जितेंद्र याच्याबरोबर चारच महिण्यापुर्वी विवाह झाला होता. विवाह करताना ती घटस्फोटीत असून तीला तीन वर्षाची मुलगी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महिणाभरापुर्वीच जितेंद्रला आपली पत्नी घटस्फोटीत नसून तीची मुलगी अनैतीक संबंधातून जन्माला आल्याचे समजले.

यामुळे तो सातत्याने चिडचिड आणि मुलीचा राग करत होता. त्याने 13 एप्रिल रोजी रात्री मुलीला आईसमोर हाताने मारहाण करुन पाय धरुन उलटे करत फिरवली होती.तसेच डोके भिंतीला आदळून तीला जखमी केले होते. यानंतर पुन्हा 15 एप्रिल रोजी मुलगी झोपली असता तीच्या गालाला थापडी मारुन तीचे पाय पकडून तीला कॉटवरुन खाली ओढले. यानंतर तीला डोक्‍याच्या दिशेने भिंतीवर आपटून जीवे ठार मारले. मुलगी निपचीत पडल्यावर आईने धावाधाव करत तीला रुग्णलयात नेले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी तीला मयत घोषीत केले. डॉक्‍टरांनी याची खबर पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालात मुलीला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी महिलेचे पुण्यात कोणीच नातेवाईक नाहीत. यामुळे मुलीला पती मारहाण करत असल्याने ती घाबरुण गेली होती. यानंतर पोलिसांनी तीला विश्‍वासात घेतल्यावर खरी घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर करत आहेत.

टीम झुंजार