पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्रास २० हजार रुपये देवून पतीस संपविले, शक्तिवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याचा केला बनाव, पण तिच्या भावाने केला भंडाफोड.

Spread the love

कानपूर :- पतीची हत्या करून ती आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी पत्नीने मृतदेहाच्या खिशात शक्तिवर्धक गोळ्या ठेवल्या होत्या. पण तिच्या भावानेच या प्रकरणाचा भंडाफोड केला.प्रियकर आणि त्याच्या मित्राला हाताशी धरून पत्नीने पतीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केलीय. कानपूरच्या बिठूर इथं ध्रुवनगरमध्ये ही घटना घडली. पतीची हत्या नसून आत्महत्या असल्याचं दाखवण्यासाठी पत्नीने पतीनं गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याचं सांगितलं होतं. यासाठी पतीच्या खिशात ८ शक्तीवर्धक गोळ्यांचे रॅपर ठेवले होते. शवविच्छेदन अहवालात मात्र गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं. हे सगळं प्रकरण पत्नीच्या भावानेच उघडकीस आणलं. त्याने बहीण, तिचा प्रियकर आणि मित्रावर संशय व्यक्त केला होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की, औरैयातील दिबियापूर इथल्या ४४ वर्षीय आबिद अली पत्नीसोबत ध्रुवनगरमध्ये राहत होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. शनिवारी आबिद यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तपासात पोलिसांना आबिदच्या खिशात शक्तिवर्धक गोळ्यांचं पाकिट सापडलं होतं. आबिदच्या पत्नीने ओव्हरडोसमुळे पतीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. आबिद यांच्या मेहुण्याने हत्येची शंका व्यक्त केली होती. मृतदेहाच्या गळ्यावर व्रण दिसले होते. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात आबिद यांचा गळा दाबून खून झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी आबिदची पत्नी शबानाच्या भावाच्या तक्रारीनंतर शबाना, तिचा प्रियकर रेहान आणि मित्र विकास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी सांगितले की, पत्नीने प्रियकर आणि तिच्या मित्रासोबत मिळून पतीची हत्या केली. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केलीय. आबिद आणि त्याची पत्नी शबाना यांच्यात घरगुती कारणावरून वाद होत होते. यादरम्यान सोशल मीडियावर शबानाची रेहानशी मैत्री झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमातही पडले. मात्र दोघांच्या नात्यात आबिदचा अडथळा होता. त्याचा काटा काढण्यासाठी शबानाने रेहानला २० हजार रुपये दिले. रात्री एक वाजता शबानाने दरवाजा उघडल्यानंतर रेहान आणि विकास यांनी आबिदची गळा दाबून हत्या केली.

मुख्य संपादक संजय चौधरी