दोघं अनेक वर्षं प्रेमबंधनात, कुटुंबीयांचा विरोध 5 वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन केलं लग्न,अन् आता दोघांनी जीवन संपवल्यान सगळ्यांनाच बसला धक्का.

Spread the love

कानपूर :- लग्न करणं हा प्रत्येकाचा खासगी अधिकार आहे. कुणाशी, कधी, कुठल्या पद्धतीने आणि कसं लग्न करायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पारंपरिक पद्धतीत अरेंज्ड म्हणजे कुटुंबियांनी ठरवून केलेलं लग्न रूढ आहे; पण गेल्या काही दशकांपासून लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे.काही प्रेमविवाह यशस्वी होतात तर काही फसतात. अनेकदा कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे त्या जोडप्याला दोन्ही कुटुंबांपासून वेगळं व्हावं लागतं. कधीकधी जोडपी टोकाचं पाऊल उचलतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ प्यायला. त्या दोघांना गडबडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं. अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला होता. आता दोघांनी जीवन संपवल्याचं कळल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत या दोघांनी विष का प्यायलं? याचं ठोस कारण सापडलेलं नाही. शेजारपाजारच्या कुटुंबांकडून दोघंही खूप सुखाचं आणि आनंदाचं जीवन व्यतीत करत होते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या जोडप्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा? हा प्रश्न पोलिसांनादेखील पडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत या दोघांनी विष का प्यायलं? याचं ठोस कारण सापडलेलं नाही. शेजारपाजारच्या कुटुंबांकडून दोघंही खूप सुखाचं आणि आनंदाचं जीवन व्यतीत करत होते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या जोडप्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा? हा प्रश्न पोलिसांनादेखील पडला आहे. कानपूरमधील नौबस्ता भागात राहणारी सलोनी सचान आणि अल्केश सचान या दोघांचं परस्परांवर प्रेम होतं. पण त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता.

दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारून पाच वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर ते पनकील्या पतरसा या गावामध्ये घर भाड्याने घेऊन राहत होते. त्यांचा नवा संसार सुखाने चालला होता. फोन रविवारी रात्री या जोडप्याने विष खाल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यामागचं कारण लवकरच शोधलं जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या दोघांनी जन्मभर एकत्र राहण्यासाठी दोन्ही कुटुंबियांची भांडण करून स्वतंत्र संसार थाटला; पण पाच वर्षात त्या दोघांना आयुष्य संपवावं असं वाटलं, यामागे काय कारण असावं? असा प्रश्न पोलिसांसह दोन्ही कुटुंबियांनाही पडला आहे. घटनास्थळी कुठलीही नोट किंवा चिट्ठी आढळलेली नाही त्यामुळे या दोघांनी स्वतः विष प्यायलं की दुसऱ्या कोणी त्यांना विष दिलं? हे स्पष्ट होत नाही, असं पोलिसांचं मत आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी