विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्धमान महावीर यांची संयुक्त जयंती साजरी…

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम
कळंब : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर ता इंदापूर जि पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिराव फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर यांचा संयुक्त जयंती महोत्सव महाविद्यालयात दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. ज्योत्स्ना गायवाड यांनी करून दिला.

संस्थेचे सचिव मा.विरसिंह भैय्या रणसिंग,प्रमुख वक्ते अनिल रुपनवर पाटील आणि उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले . संस्थेचे सचिव माननीय विरसिंह भैय्या रणसिंग यांचा सत्कार उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे यांनी केला व वक्ते अनिल रुपनवर पाटील यांचा सत्कार संस्थेचे सचिव विरसिंह भैया रणसिंग यांनी केला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रामचंद्र पाखरे प्राध्यापक ज्योत्स्ना गायकवाड सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुळीग तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे सचिव वीरसिंह भैय्या रणसिंग यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला

त्यानंतर उपप्राचार्य डॉक्टर अरुण कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी गौतम बुद्ध संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा या गुरू-शिष्य परंपरेचा सखोल असा आढावा घेतला सामाजिक प्रबोधन किती महत्वाच आहे याविषयी चर्चा केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अनिल रुपनवर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांचे समाजासाठी असलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले. जातीचा प्रश्न आजही समाजात असलेला आपणास दिसून येतो. त्यामुळे तिचा समूळ नाश झाला पाहिजे. याबद्दल आपण काय करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. आपण समाजात वावरत असताना नैतिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे. याविषयी मार्गदर्शन केले. जातीच्या प्रश्नावर त्यांनी कडाडून हल्ला केला आणि प्रत्येक समाजातील घटकाने बंधुभावाने समाजात एकीने राहावे असे मत व्यक्त केले. यानंतर संस्थेचे सचिव माननीय वीरसिंह भैय्या रणसिंग यांनी अध्यक्षीय समारोप केला त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान अतिशय मोलाचे आहे त्यावरच आजचा हा समाज हा पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे. असे मत व्यक्त केले त्याचबरोबर आपणही या महापुरुषांनपासून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये चांगलं काम करावं अशी इच्छा व्यक्त केली. तसेचआपले विद्यार्थी वक्तृत्व कलेत पारंगत व्हावेत यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भाषण कला वर्ग सुरु करूयात असे मत व्यक्त केले अतिशय नियोजनयुक्त हा महोत्सव साजरा करण्यात आला त्याबद्दल संस्थेचे सचिव वीरसिंह भैय्या रणसिंग यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले
सूत्रसंचालन प्राध्यापक अभिजीत शिंगाडे आणि प्राध्यापक मोनिका गायकवाड यांनी केले.
छायाचित्र संकलन -प्राध्यापक गणेश ठोंबरे यांनी केले

टीम झुंजार