टाटा आयपीएल – हैदराबादच‍ा विजयी सनराईझ

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा आजचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने ७ चेंडू आणि ७ गडी राखून हा सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

पंजाब किंग्जकडून लिअम लिव्हिंगस्टोनने चांगली फलंदाजी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने केन विल्यमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. लिअम लिव्हिंगस्टोनने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूंत ६० धावा काढल्या. शाहरूख खानलाही भुवनेश्वर कुमारने केन विल्यमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने २६ धावा काढल्या. डावाचं २०वं षटक उमरान मलिकने टाकलं. त्याचं हे षटक निर्धाव होतं. आणि ह्या षटकात ४ गडी देखील बाद झाले. उमरान मलिकचं गोलंदाजी पृथक्करण ४-१-२८-४ असं होतं. तर भुवनेश्वर कुमारचं ४-०-२२-३ असं होतं. पंजाब किंग्जचे १५१ ह्या धावसंख्येवर ५ गडी बाद झाले. अर्थात २०व्या षटकाच्या अखेरीस पंजाब किंग्जचे १५१ ह्या धावसंख्येवर सगळा संघ बाद झाला होता.

सनरायझर्स हैदराबादकडून आयदेन मार्करामने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २७ चेंडूंत बिनबाद ४१ धावा काढल्या. तर निकोलस पुरनने बिनबाद ३५ धावा काढल्या. राहुल त्रिपाठीला राहुल चहरने शाहरूख खानकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३४ धावा काढल्या. अभिषेक शर्माला राहुल चहरने शाहरूख खानकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २५ चेंडूंत ३१ धावा काढल्या. कर्णधार केन विल्यमसन केवळ ३ धावांवर बाद झाला. राहुल चहरचे गोलंदाजी पृथक्करण ४-०-२८-२ होते. सनरायझर्स हैदराबादचा १५२/३ विजयी सनराईझ झाला.
उमरान मलिकला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४-१-२८-४ अशी टिच्चून गोलंदाजी केली होती.

टीम झुंजार