रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण

Spread the love

अमरावती :- महावितरण हे असे खाते आहे, जे पैसे मिळाले तरच काम करते. म्हणजे रस्त्यात खांब येतोय, तो हटवायला देखील पैसे भरावे लागतात. घरावरून लाईन जातेय, पैसे भरले तरच ती लाईन थोडी वाकडी करून नेली जाते.लोकांच्या जिवावर उठेल याचे या खात्याला काहीच नसते. अशाच एका खांबाच्या स्थलांतरासाठी एका नागरिकाने चक्क खांबावरच खाट बांधून उपोषण केले आहे.

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा रंगू लागली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे. इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले आहे.

वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला सुरुवात केली. इलेक्ट्रिकच्या पोलवर खाट बांधून त्यावर बसत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न सोनोरीत उपस्थित करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी खांब रस्त्यातच असतात…

गावागावात अनेक ठिकाणी विजेचे पोल हे रस्त्यातच उभारलेले असतात. वाड्या वाड्यांना जाण्यासाठी काही वेळा नवीन रस्ते केला जातात. तेव्हा त्यात खांब येतात. आधीच्याच रस्त्यांवर काहीवेळा हे खांब उभे असतात. परंतू, ते हटवून रस्त्याच्या बाजुला उभारण्याची तसदी घेतली जात नाही. कोणाच्या शेतात मधोमध खांब असतो. हे खांब बाजुला करण्यासाठी महावितरण कडून पैसे आकारले जातात. लोकांच्या जिवाचा विचार केला जात नाही, असा आरोप वेळोवेळी लोक करत असतात.

मुख्य संपादक संजय चौधरी