Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याचे विचित्र वेड लागले आहे.स्टंटबाजीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासाठी ही मंडळी तयार असते.अनेकदा धोकादायक स्टंट करताना काहींना जीवही गमवावा लागला आहे तर कधी गंभीर दुखापत झालेली आहे.सध्या अशाच एका तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात धावत्या लोकलच्या दरवाजात तरुणांचा स्टंटबाजी पाहण्यासाठी मिळत आहे.मुंबई लोकल गेल्या काही वर्षात अनेक त्यात होणाऱ्या विविध घटनांमुळे ओळखली जात आहे.कधी महिलांची जोरदार हाणामारी होत असते तर कधी काही तरुणांचे धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी सुरु असते.सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओही एका तरुणाच्या स्टंटबाजी आहे,ज्यात त्याने नुसते दरवाजात लटकून स्टंट केले नाही तर थेट धावत्या रेल्वेच्या वर चढून चढला आहे,मात्र यात त्याला गंभीर दुखापत झालेली आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला धावती लोकल ट्रेन दिसत आहे.ज्यात एका दरवाजातून एक तरुण बाहेर येऊन दरवाजाला लटकतो. अनेक मिनिटे तरुणाची स्टंटबाजी सुरु असते,मात्र काही वेळाने हा तरुण थेट धावत्या लोकलच्या दरवाजातून लोकलच्यावर चढण्याचा प्रयत्न करतो ज्यात तो वर जाण्यात यशस्वी सुद्दा होतो.मग ट्रेनच्या वर चढल्यानंतर तो धोकादायक स्टंट करण्यास सुरुवात करतो,मात्र काही वेळाने धावत्या लोकलच्या वर स्टंट करताना त्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसतो.सर्व व्हिडिओ ट्रेनमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

स्टंटबाजीचा व्हिडिओ ”एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘@ActualidaViral’या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नक्की कुठल्या रेल्वे मार्गावरील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया केलेल्या आहेत.सोशल मीडियावर याआधी ही अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे,ज्यात नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या होत्या.

टीप : स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी