हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.

Spread the love

सागर :- नवरदेवाचा लग्नमंडपातच मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमधील सागर येथे घडली आहे. 28 वर्षीय हर्षित चौबे याचा लग्नमंडपातच हार्टअॅटॅकने मृत्यू झाला आहे. ज्या व्यक्तीसोबत हर्षित त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार होता तिच्यात मांडीवर त्याने प्राण सोडला.नातेवाईक, मित्रपरिवार अशा सर्वांच्या साक्षीने एकमेकांना जीवनसाथी बनवण्यासाठी नवरा-नवरी दोघेही सज्ज होते. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहिली. बँड, बाजा, बारात… अशी सगळी तयारी झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद होता. मात्र लगबग सुरु असलेल्या लगीनघरात क्षणात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सप्तपदी सुरु असताना हर्षितला हार्टअॅटॅक आला. अग्नीला फेऱ्या मारत असताना हर्षितला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत दुखत होतं. त्याने ही गोष्ट होणाऱ्या पत्नीला सांगितली. मात्र थकल्यामुळे असं होत असेल असं तिने म्हटलं. मात्र काही वेळात हर्षितचा अधिक त्रास होऊ लागला आणि तो खाली बसला. काही वेळातच नवरीच्या मांडीवर तो बेशुद्ध झाला. मंडपात उपस्थित असलेल्यांना तातडीने हर्षितला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हर्षितचे गोपालगंजमध्ये मेडिकल स्टोअर असून काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न ठरले होते.
नवरदेवाचे स्वतःचे मेडिकल स्टोअर होते, आणि त्याच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेातील सागर इथे घडली आहे. 7 जन्म सोबत राहण्याचं वचन घेत असताना 7 सेकंदात सगळं संपल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. या घटनेने नववधूचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं असून, लग्नाच्या आनंदाचा क्षण दु:खात बदलला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात आला.

मुलाचा मृतदेह घरी आला

लग्नाऐवजी मुलाचा मृतदेह घरी पोहोचला. यानंतर, शनिवारी हर्षित चौबे याच्यावर त्याच्या वडिलोपार्जित गावी जयसिंगनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हर्षितचे गोपाळगंजमध्ये एक मेडिकल स्टोअर होते आणि त्याचे लग्न काही महिन्यांपूर्वीच ठरले होते, असे सांगितले जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी