VIDEO: बिहारमधील शिवहार जिल्ह्यात रात्रीच्या वेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाचे लग्न लावून देण्यात आले. हे प्रकरण ताजपूर गावाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलीने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले तेव्हा तो मुलगा 17 किमी अंतर प्रवास करून रात्री तिला भेटण्यासाठी पोहोचला.रात्रीच्या अंधारात दोघे भेटत असताना प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्यांना रंगेहाथ पकडले आणि हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचे लग्न लावून दिले.
शहर पोलिस स्टेशनचे प्रमुख अभय कुमार सिंह यांनी सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही बालिक आहेत. दोघांनाही आपापले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तरीही, दोन्ही बाजूंकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिस सहभागी झाले आहेत.
असे सांगितले जात आहे की मुलगा आणि मुलगी अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक प्रियकर रात्रीच्या अंधारात गुपचूप आपल्या प्रेयसीला भेटायला गेला, पण प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले आणि त्यांचे लगेच लग्न लावून दिले.