झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- गेल्या अनेक दिवसापासूनची प्रतिक्षा असलेली जळगाव तळई रातराणी बस अखेर एकदाची सुरू झाल्याने जिल्हाभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही बस जळगाव येथे रात्री ८.३० वा. येते व जळगाव येथून रात्री ९.०० वा. तळईसाठी सुटते. सकाळी तळई येथून ८ वा. निघून १० वाजेपर्र्यत जळगाव येथे येते.
संपकरी कर्मचारी आता कामावर येवू लागल्याने पं्रवाशांंच्या सोयीसाठी एरंडोल आगाराची तळई रातराणी बस रविवारी १७ पासून सुरू केली असल्याचे आगारपं्रमुख विजय पाटील यांनी सांगितले. विभागीय वाहतूक निरीक्षक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल आगाराचे आगारप्रमुख विजय पाटील, वाहतूक निरीक्षक गोविंदा बागूल यांनी अखेर प्रवाशांची अनेक दिवसापासून होत असलेली मागणी पूर्ण केली आहे.
या रातराणी बसचे जिल्हाभरात प्रवासी आहेत. जळगावहून रात्री ९ वा. सुटणारी ही एकमेव बस असल्याने व्यापार, खरेदी, नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवासी जळगाव येथे ये जा करतात. तब्बल अनेक प्रवासीसाडेपाच महिने या सर्व प्रवाशांचे तसेच विद्याथ्र्र्याचे अतोनात हाल होत होते.