मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम, मुलगीसह तिच्या कुटुंबीयांचा लग्नास नकार, रागातून तरुणीच्या भावाला संपवलं, अजितला कोर्टाने धडा शिकवला.

Spread the love

पुणे :- धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली. अजित कान्हूरकर असं आरोपीचं नाव आहे. मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 12 जून 2018 ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागलाय.अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र मामाचा अन मुलीचा दोघांचाही या लग्नास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं. याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसेपासून त्याने केली. श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले. कोयत्याने त्याच्या डोकं, मान आणि डोळ्यावर हल्ला चढवला.

आजन्म कारावासाची शिक्षा

अटकेनंतर ही अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता, इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोर ही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं.

बहुत तडफा हूँ, उसको भी तडपणा चाहिये

मामाची मुलगी आणि अजित पुण्यात इंजिनियरिंगचं स्वतंत्र महाविद्यालयात शिक्षण घेत होते. विवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने अजितने त्या मुलीचे अश्लील फोटो आणि खाजगी मेसेज फेसबुकवर पोस्ट केले. याप्रकरणी 8 जून 2018 रोजी मुलीने खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. तक्रार दाखल केल्यामुळे अजित संतापला. त्याने फेसबुकवर पुन्हा “माफ कर दो भाईलोग, बहुत तडफा हू. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपणा चाहिये.” असा मजकूर टाकला होता.

मुख्य संपादक संजय चौधरी