नगरपालिकेने कत्तलखाना केला सील, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
एरंडोल :- येथील आठवडे बाजार परिसरात महादेव मंदिरासमोर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या कत्तलखान्यात गोवंशाचे तसेच म्हशीचे मांस व अवयव आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेवून गुन्हा दाखल केल्यामुळे अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी,की आठवडे बाजार परिसरातील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या कत्तलखान्यात गोवंश व म्हशीचे मांस तसेच गुरांचे अवयव पडले असले असून याठिकाणी मोठा जमाव जमा झाला असल्याची पोलिसांना मिळाली.सदरचा
कत्तलखाना अनेक वर्षांपासून बंद असून याठिकाणी जनावरांची कत्तल करण्याची परवानगी नाही.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक शंकर पवार,सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले यांचेसह हवालदार अनिल पाटील,विलास
पाटील,कपिल पाटील,सचिन पाटील,आकाश शिंपी,अनंत पाटील,संदीप पाटील यांचेसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी कत्तलखान्याची पाहणी केली असता त्याठिकाणी
सुमारे पंधरा किलो गोवंश व म्हशीचे मांस,अवयव,शिंग तसेच कत्तलीसाठी लागणारे साहित्य आढळून आले.पोलिसांनी तत्काळ तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.प्राप्ती पारखे,पशुधन विकास अधिकारी डॉ.अविनाश रणवीर,डॉ.राहुल साळुंखे यांना कळवल्यामुळे ते घटनास्थळी दाखल झाले.पशुधन विकास अधिका-यांनी घटनास्थळावर पडलेल्या मांसाचे नमुने जमा करून तपासणीसाठी पाठवले.कत्तलखाना परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाल्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वांची समजूत काढल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पोलसांनी पालिका कर्मचा-यांच्या मदतीने सर्व मांसाची विल्हेवाट लावली. व नगरपालिकेने कत्तलखाना केला सील केला
याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कत्तलखान्यात गोवंशाचे मांस सापडल्याची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून घेतलेल्या संयमी भूमिका घेवून परिस्थिती शांतपणे हाताळल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.