जळगाव :- चार लाख 85 हजार रुपये किमतीचा लसुन नागपूर येथून नियोजित ग्राहकास न पोहोचवता स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी जळगावला आणून अपहार करणा-या टेम्पो चालका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद बेकरीतून मोठा साठा जप्त करण्यात आला.फरार टेम्पो चालकाचा शोध देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक करत आहेत. विनोद गणेश रुढे (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे या फरार टेम्पो चालकाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नितीन साहित्य नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथील एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या साठविल्या आहेत. या माहितीवर आधारित एमआयडीसी पोलिसांचे एक पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आली.
सहा पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस नाईक रवींद्र परदेशी, पोलीस शिपाई शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे आणि राहुल पाटील यांचा स्टाफ बेकरीची झडती घेण्यासाठी उपस्थित होता. पंचांच्या समक्ष तपास केला असता, बंद बेकरीत ९७ गोण्या लसूण सापडल्या, ज्यांची किंमत सुमारे ४ लाख ८५ हजाराचे रुपये आहे. तसेच बेकरीचे मालक, ईश्वर प्रकाश राठोड यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे, सुप्रीम कॉलनी, जळगाव याने हे माल कुठून तरी विकत आणले आहे. मात्र मालाच्या खरेदीची कोणतीही बिले त्यांच्या ताब्यात नाहीत. राठोड यांनी फक्त साठवण्यासाठी माल बेकरीत ठेवला होता. त्यामुळे लसूण मालाची स्वामित्वाबाबत संशय उपस्थित झाला.
एमआयडीसी पोलिसांनी यानंतर माल जप्त करुन, विनोद रुढे याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात समोर आले की, श्याम रमेश मनवाणी, नागपूर येथील टाटा ओनियन कंपनीचे मालक, या मालाची खरी मालकता आहेत. त्यांनी या मालाची महिंद्रा टेम्पो चालक, ईश्वर रुढे याच्या ताब्यात दिली होती. रुढे यांनी मात्र, माल पोचविण्याऐवजी, तो चोरून घेतला आणि त्याचे स्वतःचे आर्थिक फायदे साधले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, माल जप्त केला. श्याम रमेश मनवाणी यांना त्यांचा माल परत केला. श्याम मनवाणी यांनी जळगाव पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, जळगाव, संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.