नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा संदेश युवकांपर्यंत पोहचविण्यासाठीच कुस्ती महाकुंभचे आयोजन:- ना. गिरीश महाजन

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामनेर येथे कुस्त्यांचा भव्य सोहळा संपन्न.

जामनेर(प्रतिनिधी): – लालमातीच्या सुगंधात “देवाभाऊ केसरी”व नमो कुस्ती महाकुंभाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यात देशात कुठेही न झालेल्या एवढ्या मोठ्या भव्य कुस्तीचा सामना शहरातील हिवरखेडा रोडवरील भव्य पटांगणावर दि.१६ फेब्रुवारी रोजी झाला.सामन्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदामंत्री मंत्री गिरीश महाजन जामनेर नगर परिषदेच्या मा. नगराध्याक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा.स्मिता वाघ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आ.सुरेश भोळे, आ.अमोल जावळे,आ.मंगेश चव्हाण,आ.संजय कुटे,जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जितेंद्र पाटील दुध संघाचे चेअरमन अरविंद देशमुख तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते .

आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या महाकुंभात विदेशासह देशातील नामांकित मल्लांनी आपल्या कुस्तींचे मोठे प्रदर्शन केले.त्याच कुस्तीच्या आखाडय़ात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विरोधकांचा समाचार घेतला.विरोधकांनी वेळोवेळी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या परंतु राज्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पसंती दिली व महायुतीला बहुमताने निवडून दिले. तसेच लाडकी बहिण योजना बंद होणार नसुन ज्यांचे उत्पन्न दोन पट,तीन पट असतील किंवा जे निकषात बसत नसतील त्यांना वगळण्यात येईल परंतु जे निकषात बसतील त्यांनाच त्याचा लाभ मिळेल.

दिल्लीकरांनी सुद्धा भाजपाला पसंती दिली व बहुमताने निवडून दिले. युवकांनी “नाद कुस्तीचा” व”प्रण व्यसनमुक्तीचा” हा संदेश देशातील युवा पिढी पर्यंत पोहचविण्यासाठीच कुस्ती महाकुंभाचे आयोजन केल्याचे ना. महाजन सांगितले. आयोजित केलेल्या कुस्ती दंगलीत देशासह फ्रान्स, माल्दोवा, उझबेकिस्थान,रोमानिया,आणि एस्टोनिया या देशातील जागतिक पातळीवर वरील विजेते, हिंद केसरी, रूस्तुम- ऐ – हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, यासारख्या मल्लांसह महाराष्टातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू सहभागी झाले.” नमो कुस्ती महाकुंभ” व “देवाभाऊ केसरी” कुस्त्यांचा थरार बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली.

मुख्य संपादक संजय चौधरी