
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा – तालुक्यातील मंगरूळ विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी १७ एप्रिल रोजी निवडणुक घेण्यात आली. या १२ जागेंच्या चुरसीच्या लढतीत १२ पैकी १२ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत मंगरूळ विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.
यात महिला राखीव मतदारसंघातुन पाटील मंगलबाई रामकृष्ण व पाटील निर्मलाबाई आबाजी, इतर मागसवर्गीय मतदारसंघातुन पाटील हेमराज गंजीधर, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातुन सोनवणे केवळबाई बापु, सर्वसाधारण मतदारसंघातुन भरत सोनु पाटील, सुनिल अभिमन पाटील, उदयलाल सुकलाल पाटील, बापु ताराचंद पाटील, भगवान बन्सिलाल पाटील, भरत येवलकर पाटील, सदाशिव हिलाल पाटील व गोरख देवराम पाटील यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, पारोळा बाजार समिती मा.उपसभापती मधुकरआबा पाटील, शेतकी संघ व्हा. चेअरमन नाना पाटील, मा.व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, दिपक वसंतराव पाटील, अशोक मोहनराव पाटील, येवलकर धनजी पाटील, रावसाहेब काशिनाथ पाटील, दिलीप भास्कर पाटील, सुरेश अभिमन पाटील, सुशिल पाटील, समाधान भास्कर पाटील, राकेश सुरेश पाटील, दत्तु गोपीचंद पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
