महापुरुष म्हणजे प्रेरणास्थान त्यांना देवपण देऊन सिमीत करू नका :- प्रदीप गायके

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- आपले महापुरुष म्हणजे आपल्यासाठी प्रेरणा देणाऱ्या स्थानी असून आपण त्यांच्या प्रेरणा आर्दश समोर ठेवून जिवन जगाव त्यांना देवपण देवुन त्यांना व त्यांच्या विचारांना विशीष्ट चौकटीत सिमीत न करण्याचे आवाहन शिवश्री प्रदीप गायके यांनी स्वराज्यसुर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती उस्तवाच्या निमीत्त भिमनगर येथे आयोजीत शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना केले.यावेळी दिलीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते किशोर तायडे,डॉ.नंदलाल पाटील,डॉ.उमाकांत पाटील,नरेंद्र जंजाळ, प्रल्हाद बोरसे,गणेश झाल्टे,मुकुंदा सुरवाडे, सुभाष सुरवाडे,कैलास नरवाडे,नंदा मघाडे, प्रवीण तायडे, अण्णा तायडे, अजय साबळे,सचिन सुरवाडे,सौरव अवचारे,अक्षय निराले,सचिन चौधरी,आदीसह समाज बांधव उपस्थित होते,

डॉ.नंदलाल पाटील, नंदा मघाडे, किशोर तायडे यांनीही आपले विचार यावेळी उपस्थितां समोर व्यक्त केले.दरम्यान गायके यांनी सांगितले की छत्रपतींच्या राज्य कारभारात व सैन्यामध्ये जातीपातीला थारा नव्हता.परंतु काही विकृत विचार घटकांनीं खऱ्या इतिहासात घाल भेसळ करून विशिष्ट समाजा विषयी विष पेरण्याचेच काम केले.परंतु इतिहासा विषयी जागरूक असणाऱ्या परिवर्तनशील संघटना व नागरिकांनी विकृत विचार समाजात पोहचू न देण्यास बऱ्याच अंशी आळा घातला याचीही नोंद आपण यावेळी घेतली पाहिजे असे सांगितले. आयोजनमध्ये शुभम सोनवणे, नितीन सुरवाडे, कौशल, सुरवाडे,शुभम जंजाळे, आदर्श इंगळे, नरेंद्र भीमडे,रितेश मोरे,मोहित सुरवाडे,सम्राट सुरवाडे,यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक संजय चौधरी