एरंडोल :- शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठिकठीकाणी पुतळा व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शैक्षणिक संस्थांच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात
आली.
राजे संभाजी पाटील सामाजिक व सांस्कृतिक मंडळ.-
येथील राजे संभाजी पाटील सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
उत्साहात साजरी करण्यात आली.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड अध्यक्षस्थानी होते.शिवरायांचा आणि संभाजी राजेंच्या पराक्रमाबाबत दशरथभाऊ महाजन यांनी सविस्तर माहिती दिली तर जगदीश ठाकूर, देविदासभाऊ महाजन, निलेश गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्त करून शिवरायांचे विचार, पराक्रम प्रत्येक घरात जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख (शिवाजी) टाळावा असे आवाहन करतांना स्पष्ट केले की, उमवि विद्यापीठासह राज्यात इतिहास विषयासाठी शिवरायांचा एकेरी उल्लेख नसतो. त्यास एरंडोल शिवजयंती ठराव (सर्वपक्षीय) संदर्भ असून आता जय भवानी-जय शिवाजी ऐवजी जय भवानी जय शिवराय असे म्हणावे. सर्वांनी टाळ्या वाजवून संमती (एकमताने) दिली. शेवटी अध्यक्ष मनिष गायकवाड यांनी देखील एरंडोलच्या शिवजयंती बाबत दरवर्षी शांततेत संपन्न होते. याबाबत कौतूक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी तर आभारप्रदर्शन गजानन पाटील यांनी मानले. शेवटी जय भवानी-जय शिवराय म्हणत महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध सामाजिक,शैक्षणिक संघटनांच्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली.प्रा.मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. आर.डी.पाटील यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास आमदार
अमोल पाटील,मृणाल पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,दशरथ महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश
महाजन,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर, रमेश अण्णा महाजन, माजी नगराध्यक्ष राजेन्द चौधरी अभिजित पाटील,बबलू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, प्रा.शिवाजीराव अहिरराव, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,डॉ.सुरेश पाटील, डॉ किरण पाटील परेश बिर्ला,अमोल जाधव यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघवी अंतरराष्ट्रीय स्कूल-उत्राण (ता.एरंडोल)
येथील एस.बी.संघवी अंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये प्राचार्या वैशाली पंडित यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे सादर केले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महेश काकॅह्रे यांनी शिवगर्जना सादर केली.राहुल पाटील यांनी आकर्षक शिवजन्म कलाकृती फलक लेखन केल्याबद्दल त्यांचा प्राचार्या वैशाली पंडित यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी,सचिव शितल
माळी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दादासाहेब पाटील महाविद्यालय-येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील
महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांचेहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गाढे यांनी प्रास्ताविक केले.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश एंडाईत यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील,उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर,मुख्याध्यापक प्रवीण केदार,प्रा.महेश बिर्ला,सुदाम पाटील,सुरेश पांडे,जगन्नाथ पाटील, उपप्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक प्रा.नरेंद्र गायकवाड, कुलसचिव सोमनाथ बोरसे,प्रा.नरेंद्र तायडे,प्रा.नितीन दांडेकर, प्रा.डॉ.राम वानखेडे,प्रा.संदीप कोतकर,प्रा.सोपान साळुंखे,प्रा.हेमंत पाटील,प्रा.मीना काळे,प्रा.उमेश गवई,प्रा.सागर विसपुते,प्रा.उमेश सूर्यवंशी,शेखर पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते.
शिवछत्रपती मित्र परिवार-
येथील शिवछत्रपती मित्र परिवाराच्यावतीने धरणगाव चौफुली येथे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवछत्रपती मित्र परिवाराचे प्रमुख राजेंद्र शिंदे यांचेसह
पदाधिका-यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.कार्यक्रमास माजी नगरसेविका वर्षा शिंदे,पल्लवी पाटील,उद्योजक समाधान पाटील, प्रमोद महाजन,मोहन चव्हाण,पराग पवार,गजानन पाटील, स्वप्निल सावंत,डॉ.राजेंद्र चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश स्कूल-
येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये अध्यक्ष अमित पाटील यांचेहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी
पोवाडे,गाण्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमास प्राचार्य दिनानाथ पाटील,शेखर पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ-
येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांचेहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमा सचिव विनायक कुलकर्णी, कवी निंबा बडगुजर,नामदेव पाटील,जगन महाजन,सुरेश देशमुख यांचेसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.