ब्रेकिंग न्यूज! वडिलांच्या सांगण्यावरून जेसीबी चालकाने केला रील्स स्टार विक्की पाटीलचा खून.

Spread the love

एरंडोल :- रील्स स्टार हितेश विठ्ठल पाटील उर्फ विकी हा दारू पिऊन आई वडील यांना मारहाण करत असल्यामुळे त्रस्त झालेल्या वडिलांच्या सांगण्या वरून जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील याने विकिचा गळफास देवून खून केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी दिली.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेसह सहाय्यक उपनिरीक्षक राजेश पाटील, हवालदार अनिल पाटील,संदीप पाटील,मिलिंद कुमावत, योगेश महाजन,भाऊसाहेब मिस्तरी,दीपक पाटील, सचिन पाटील,आकाश शिंपी यांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त केली आहे.

  रील्सस्टार विकी उर्फे हितेश पाटील हा दारू पिऊन आईवडिलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील यास मुलाचा कायमचा बंदोबस्त करण्याचे सांगितले.विठ्ठल पाटील यांचे सांगणेवरून जेसीबी चालक रवींद्र पाटील याने विकी यास दारू पाजली.दारू पाजल्यानंतर रवींद्र पाटील हा विकी यास शेतात घेवून गेला.शेतात विकी झोपल्यानंतर रवींद्र पाटील याने विकीचा दोरीने आवळून खून केला.विकी मयत झाल्यानंतर त्याने वडील विठ्ठल पाटील यांना कळवले.त्यानंतर विठ्ठल पाटील यांनी त्यांचे भाऊ नामदेव सखाराम पाटील यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. नामदेव पाटील यांचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील यास कोणतीही कल्पना नसल्यामुळे तो वडिलांना शेतात मोटरसायकलवर सोडण्यासाठी आला होता.

मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबी चालक रवींद्र पाटील याने जेसीबी खड्डा खोदला व तिघाही संशयीतांनी त्यास खड्ड्यात पुरले. त्यांनतर वडील विठ्ठल पाटील घरी आले व त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्यांनी मी मुलगा हितेश याचा खून केला असून त्याचा मृतदेह भवरखेडा येथील एका कोरड्या तलावात पुरला असल्याचे लिहिले होते.पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून हितेशचे काका,चुलत भाऊ,आणि जेसीबी चालक रवींद्र पाटील यांना अटक केली.माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांच्या मोठ्या मुलाने देखील दीड ते दोन वर्षांपूर्वी गळफास आत्महत्या केली होती.

रील्सस्टार विकी यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो आईवडिलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी टोकाचे पाउल उचलले.मयत विकी याचे पच्छात पत्नी व केवळ चार ते पाच महिन्यांचा मुलगा आहे.दारूच्या व्यसनामुळे एका रील्सस्टारला स्वत:चा जीव गमवावा लागला तर वडिलांनी देखील आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी