खासगी सावकाने व्याजाच्या पैशापोटी महिलेस दारू पाजून केला वारंवार बलात्कार, अन् फोटो काढून बनविले व्हिडिओ.एकास अटक

Spread the love

रामा जानकर सारखे अनेकजण आज शहर आणि शहराच्या मुख्य भागात खासगी सावकारी करून अनेकांना दमदाटी करीत आहेत. बळजबरीने कोऱ्या धनादेश आणि स्टॅम्पवर सह्या घेतल्या जात आहेत.

कोल्हापूर : व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकास अटक केली.रामा विठ्ठल जानकर (वय ४६,रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. दारू पाजून बेशुद्ध करून छायाचित्र आणि व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक सुख घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

२०१४ ते २४ दरम्यान त्याने हा गुन्हा गेल्याचे फिर्यादीने म्हटले असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रामा जानकर याने फिर्यादी महिलेला २०१४ मध्ये दहा टक्के व्याजाने सत्तर हजार रुपये दिले होते. व्याज थकल्यानंतर फिर्यादी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा जानकरने घेतला.दारू पाजवून बेशुद्ध अवस्थेत छायाचित्र व चित्रीकरण केले. छायाचित्रे आणि व्हिडिओ नातेवाइकांना दाखवणार, अशी धमकी दिली. तिच्यावर बळजबरी करून इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले.

तसेच व्याजासाठी राहते घर तीन लाखांसाठी बळजबरीने लिहून घेतले आहे. व्याजासह मुद्दल परत दे नाही तर शारीरिक संबंध ठेव, असा तगादा लावून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव अधिक तपास करीत आहेत. जानकर हा अनधिकृत व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करतो. त्याच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याची कोणत्याही शासकीय दफ्तरी व्याजाने पैसे देणाऱ्या सावकरांच्या यादीत नोंद नाही.

रामा जानकर सारखे अनेकजण आज शहर आणि शहराच्या मुख्य भागात खासगी सावकारी करून अनेकांना दमदाटी करीत आहेत. बळजबरीने कोऱ्या धनादेश आणि स्टॅम्पवर सह्या घेतल्या जात आहेत. पोलिस अधीक्षकांनी शहरासह जिल्ह्यातील खासगी सावकारांचा बीमोड करण्यासाठी विशेष मोहीम उघडावी, अशी मागणी होत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी