VIDEO:लग्नाआधी मागितला अतिरिक्त हुंडा मग नवरीमुलीऐवजी तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात घातला हार, संतापलेल्या वधूने शिकवला धडा पहा व्हिडिओ

Spread the love

VIDEO: बरेली :- लग्न म्हटलं की आयुष्याचा नव्याने सुरु होणारा प्रवास असतो. या प्रवासात जर आपला जोडीदार योग्य असला तर तो सुखाने होते. पण जर ही निवड चुकली, तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नसतो. एकमेकांवर फेकल्या खुर्च्या सुदैवाने काही जणांना लग्नाच्या आधीच जोडीदाराबद्दल ही कल्पना येते किंवा माहिती मिळते. सुदैवाने काही जणांना लग्नाच्या आधीच जोडीदाराबद्दल ही कल्पना येते किंवा माहिती मिळते. तर काहींना दुर्दैवाने लग्नानंतरच हे गुपित कळतं उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. प्रकरण इथपर्यंत पोहोचलं होतं की, नवरीमुलीने नवऱ्याच्या कानाखाली लगावत लग्न मोडलं. लग्नमंडपात नेमकं काय झालं हे जाणून घ्या.

रविंद्र कुमार (२६) याचा विवाह राधा देवी (२१) या वधूसोबत रविवारी आयोजित करण्यात आला होता. पण लग्नाच्या वेळी रविंद्र कुमार विवाहस्थळी उशिरा पोहोचला. मुलीकडच्यांनी केलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की, मुलाकडच्यांनी अतिरिक्त हुंडा मागितला होता. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की लग्नाच्या आधीच मुलीच्या सासरच्यांना त्यांनी अडीच लाख रुपये दिले होत, तर लग्नाच्या दिवशी २ लाख रुपये दिले होते. पण त्यांना ते पुरेसे झाले नाहीत, त्यामुळे त्यांनी अतिरिक्त हुंड्याची मागणी केली. तसंच, रविंद्रला त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं. त्यामुळे तो विवाहस्थळी दारू पिऊन आला आणि मुलीच्या कुटुंबियांशी हुज्जत घालू लागला.

एवढा त्रास सहन करूनही नवरीमुलगी मंडपात उभी राहिली. लग्नाचे विधी सुरू झाले. अखेर वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालणार तेवढ्यात मुलाने वधूच्या शेजारी उभ्या असलेल्या तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या गळ्यात वरमाळा घातली. या घटनेमुळे संतापलेल्या राधा देवीने मुलाच्या कानशि‍लात लगावली आणि लग्न मोडलं.

अचानक लग्न मोडल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद सुरू झाले. हा वाद विकोपाला पोहोचून दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. शेवटी या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी नवरामुलगा आणि त्याच्या मित्रांविरोधात नवरीमुलीच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल आणि शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हुंडा मागितल्याप्रकरणी नवऱ्यामुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनीच नवऱ्यामुलाला दारु पाजली असं सांगितलं जात आहे. दारु विक्री प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी