बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असलेल्या युवकास भुसावळ पोलिसांनी घेतले ताब्यात.

Spread the love

भुसावळ :- शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंड जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या युवकावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल नोंदवला आहे.भुसावळ शहरातील हनुमाननगर मधील टी.व्ही. ग्राउंडजवळ संशयित आरोपी बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवार (दि.1) रोजी रात्री कारवाई करत संशय आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव (वय 32, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) या युवकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी