एरंडोल येथील एमआयडीसी प्रस्तावाला मंजुरी मिळावी; आमदार अमोल पाटील यांचे उदयोगमंत्री सामंत यांना निवेदन.

Spread the love

एरंडोल :- शहरासह ग्रामीण भागातील तसेच मतदार संघातील युवकांना रोजगार उपलब्ध व्यावा यासाठी एरंडोल येथील एमआयडीसी प्रस्तावाला त्वरित मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांचेसह विविध विभागाच्या मंत्र्यांची भेट घेवून मतदारसंघातील
विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आमदार अमोल पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे,की एरंडोल येथे एमआयडीसी प्रस्तावास मंजुरी देण्याची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात आली आहे.माजी आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल येथे एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे
सातत्याने पाठपुरावा केला होता.एमआयडीसीस मंजुरी नसल्यामुळे नवीन उद्योगधंदे,व्यवसाय सुरु होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.नवीन उद्योग मोठे व्यवसाय सुरु झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून मतदारसंघाच्या विकासात मोठी भर पडणार आहे.स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरात
जावे लागत असून अत्यंत कमी पगारात काम करावे लागत आहे. नवीन उद्योग आणि व्यवसायांसाठी एरंडोल येथे दळणवळण, पाणी,जागा यांसारख्य सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध आहेत.एरंडोल एमआयडीसीच्या मंजुरीसाठी आवश्यक
असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.आमदार अमोल पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून सदर प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली.मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश दिले.आमदार अमोल पाटील यांनी मतदारसंघातील अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर लक्ष घातल्याबद्दल युवकांमध्ये समाधान व्यक्त केले जात.दरम्यान आमदार अमोल पाटील यांनी उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचेसह विविध विभागाच्या मंत्र्यांची भेट घेवून
मतदारसंघातील समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात,तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एरंडोल एमआयडीसी संबंधी त्वरित मान्यता देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी