नागरी समस्या सोडविणे’ माझे आद्य कर्तव्य .….. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील; संघर्ष समिती तर्फे सत्काराचे आयोजन…..

Spread the love

एरंडोल :- जळगाव जिल्हा पालकमंत्री श्री. नामदार गुलाबराव पाटील यांच्या सत्काराचे आयोजन एरंडोल शहर संघर्ष समिती तर्फे करण्यात आले या प्रसंगी मंत्रिमहोदयांशी एरंडोल शहर संघर्ष समितीने संवाद साधला .त्याप्रसंगी बोलताना माननीय पालक मंत्री म्हणाले की ,एरंडोल शहराची प्रत्येक समस्या सोडवणे हे माझे आद्य कर्तव्य आहे मी प्रथम कर्तव्याला प्राधान्य देतो. नागरिकांचा आनंद हाच माझा आनंद हे मी मानतो. यावेळेस त्यांनी एरंडोल शहर संघर्ष समितीने केलेल्या कार्याबद्दल माहिती जाणून घेतली व समाजसेवेच्या व्रत घेतलेले संघर्ष समितीचे त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी एरंडोल शहर संघर्ष समितीचे अध्यक्षश्री रवींद्र जी लाळगे उपाध्यक्ष श्री नामदेवराव पाटील ,संचालक ,अडव्होकेट दिनकरराव पाटील , प्रमोद महाजन, श्री दिनेश चव्हाण ,प्रकाश आर पाटील, तुकाराम दत्तू पाटील,आर झेड पाटील,गजानन तात्या पाटील, नानाभाऊ मिस्त्री ,श्री बाविस्कर व सर्व संचालक उपस्थित होते.याप्रसंगी संघर्ष समितीच्या वतीने एरंडोल शहरातील महत्त्वपूर्ण समस्या मांडण्यात आल्या. नागरिकांना भेडसावणारा 15% कर वाढीव कर तसेच खरेदी विक्री करतांना नगरपालिका आकारत असलेला दोन टक्के सरचार्ज त्याचप्रमाणे डिसेंबर नंतर दोन टक्के अतिरिक्त चार्ज याशिवाय एरंडोल शहरालगत असलेल्या नॅशनल हायवेच्या विविध समस्या कासोदा फाटा येथे उड्डाणपल , बस स्टॅन्ड ते दत्त मंदिरापर्यंत सर्विस रोड तुटलेल्या गटारी दुरुस्त करणे, चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला नॅशनल हायवे धरणगाव चौफुली जवळ खराब झाला तो दुरुस्त करणे,बस स्टॅन्ड जवळ गटारी चे काम त्वरित करणे,नॅशनल हायवेने लावलेले अशुद्ध भाषेचे बोर्ड दुरुस्त करणे ,महामार्गावरील बंद असलेले लाईट सुरु करणे,अशा विविध समस्या बाबतीत चर्चा करण्यात आली.पालकमंत्री नामदार गुलाबभाऊ पाटील यांच्या सुस्वभावामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याशी सहजपणेपणे बोलत असतो हे याप्रसंगी अनुभवायला आले मंत्री असून सुद्धा सर्वसामान्यांबद्दल त्यांना असलेले प्रेम हा त्यांचा स्वभाव विशेष म्हटला पाहिजे या भेटीमुळे एरंडोल शहराच्या समस्या सोडवण्याबाबत चालना मिळेल अशी आशा संघर्ष समितीला वाटते संघर्ष समिती नेहमी नागरिकांच्या भल्यासाठी कार्यरत आहे असे या प्रसंगीत नामदार पाटील म्हणाले शेवटी स्वप्निल सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्य संपादक संजय चौधरी